Nilesh Lanke Esakal
महाराष्ट्र बातम्या

...नाहीतर मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसणार; निलेश लंकेचा इशारा

विधानसभेत लंके यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे ही तक्रार केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: वन खात्यातील भ्रष्टाचाराच्या (Corruption in Forest Department) विरोधात पारनेरचे आमदार निलेश लंके विधानसभेत आक्रमक झाले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास मंत्र्याच्या दालनात उपोषणाचा इशारा त्यांनी दिला. अधिवेशनात विविध सरकारी विभागांच्या कामांसंबंधी तक्रारी करून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. सध्या सुरू असलेले अधिवेशन विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पेनड्राइव्ह मुळे गाजत आहे. त्यातच लंके यांनी वन खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत उपोषणाचा इशारा दिला आहे. (MLA Nilesh Lanke hunger strike warning)

सध्या सुरू असलेले अधिवेशन विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राइव्ह मुळे गाजत आहे.

विधानसभेत लंके यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे ही तक्रार केली आहे. त्यावर वन राज्यमंत्री दत्तात्रेय भारणे (Dattatray Bharne) यांनी आठ दिवसांत चौकशीचा आदेश दिला आहे. मात्र, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास वन मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशारा लंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

निलेश लंके यांच्याच मतदार संघामध्ये वन विभागाची कामे सुरु आहेत. या कामात भ्रष्टाचार आढळल्याचे लंके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ४ जानेवारीला सुरु झालेले काम २८ फेब्रुवारीला पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र १७ फेब्रुवारीला कामाची सुरुवात होऊन १० मार्चला या कामाचा शेवट झाला. याचे पेमेन्ट मात्र २८ फेब्रुवारीला भरण्यात आले. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे असा आरोप लंके यांनी लगावला आहे. याशिवाय काम करणारी वेगळी माणसं आहेत आणि पैसे घेणारी वेगळी माणस आहेत. याची कसून चौकशी व्हावी यासाठी आज विधानसभेत आज आवाज उठवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT