Jitendra Awhad On Ram Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad On Ram: श्री रामाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड पक्षातही एकाकी; रोहित पवारांचा घरचा आहेर

Jitendra Awhad On Ram: देशभरात आयोध्दा सोहळ्याचा आंनद जल्लोष पहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादी(शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

एकीकडे देशभरात आयोध्दा सोहळ्याचा आंनद जल्लोष पहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादी(शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन देखील सुरू केलं आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशातच त्यांना आपल्याच पक्षातील नेत्यांनीही घरचा आहेर दिला आहे. वाद निर्माण करणारी वक्तव्य करु नका, असंही म्हटलं आहे.

एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी काल (बुधवारी) शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता रोहित पवारांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिला आहे.

काय म्हणालेत रोहित पवार?

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी एक्स या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट लिहली आहे. त्यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे'.

'देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तीगत विषय आहे. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ… या राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचे भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

'राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असं जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात बोलताना म्हटलं आहे.

या शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाडांना या विषयावर प्रश्न केले तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असंही ते पुढे म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुलैमध्ये सोनं 25 हजारांनी महाग; चांदी मात्र स्वस्त; पाहा ताजा भाव

Sharad Pawar: सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचे बेमुदत उपोषण सुरू

Badminton : भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू दोन वर्षानंतर जेतेपदाची लढत खेळणार; Japan Open च्या फायनलमध्ये प्रवेश

Donald Trump: FIFA फायनलमध्ये ट्रम्पची एंट्री! विजेत्या खेळाडूंना मिळणार सोन्याची खास अंगठी

SCROLL FOR NEXT