Ncp Leaders esakal
महाराष्ट्र बातम्या

Ncp Leaders: राष्ट्रवादीच्या नेत्याला तमिळनाडू सरकारचं कौतुक; ट्विट करत म्हणाले..

रुपेश नामदास

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे होणाऱ्या प्रकल्पातून सुमारे १ लाख २० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुमारे १ लाख ५४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प पिंपरी चिंचवड जवळच्या तळेगाव येथे होणार होता.

मात्र हा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला जावू दिला त्यामुळे पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील लाखो तरुणांच्या तोंडचा घास पळवला गेला. असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर होत आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत तमिळनाडू सरकारचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, "₹२३०० कोटी गुंतवणुकीचा आणि २०००० युवांना रोजगार देणारा #Pou_Chen कंपनीचा प्रकल्प खेचून आणल्याबद्दल तमिळनाडू सरकारचं अभिनंदन!

महाराष्ट्राबद्दल अशा बातम्या दिसत नसल्याने तमिळनाडू सरकारचं अभिनंदन करताना त्यांचा हेवा आणि ईर्ष्याही वाटतेय आणि आपलं राज्य मागं पडत असल्याचं दुःखही होतंय" रोहित पवार यांनी सरकारला शेलक्या भाषेत सुनावलं आहे.

दरम्यान Nike, Adidas, Timberland आणि New Balance या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी शूज बनवणारी तैवानची कंपनी आता भारतात दाखल होणार आहे. ही कंपनी तामिळनाडू येथे उभारणार आहे, म्हणजेच या सर्व ब्रँडच्या शूजवर आता 'मेड इन इंडिया' टॅग ही असेल.

तैवानची 'पौ शेन' ही जगातील दुसरी सर्वात मोठी ब्रँडेड शूज बनवणारी कंपनी आहे. कंपनी $28.08 दशलक्ष (सुमारे 2,302 कोटी रुपये) गुंतवून भारतात आपला कारखाना उभारणार आहे. भारतात Nike आणि Adidas शूजची मोठी मागणी आहे, त्यामुळे आता हे ब्रँडेड शूज भारतात बनवता येतील.

पौ शेन मोठ्या प्रमाणावर शूज निर्यात करतात. 2022 मध्ये, त्यांनी 272 दशलक्ष शूजची निर्यात केली. तामिळनाडूमध्ये उभारल्या जाणाऱ्या नव्या कारखान्यामुळे राज्यात 20000 नोकऱ्या निर्माण होतील, असा कंपनीचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

Lasalgaon News : लासलगावमध्ये नायलॉन मांजाचा कहर; युवकाच्या तोंडाला २१ टाके

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

SCROLL FOR NEXT