MLA Rohit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना विचारावं; रोहित पवारांचा टोला

'मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील नेत्यांना बरे वाटावे म्हणून त्यांची वाहवा केली'

सकाळ डिजिटल टीम

'सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणी कळतात का? केंद्रातील नेत्यांचे वाहवा करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.'

कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न सोडवायचा सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री या तिघांनी वेगवेगळ्या पद्धतीने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.

केंद्राने नाफेडकडून कांदा खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या शेजारीच बसले होते. या पत्रकार परिषदेत केंद्रातील नेत्यांची वाहवा करताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीही असा निर्णय घेतला नाही, असे सांगितले. त्या वेळी शेजारी बसलेल्या अजित दादांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ते विचारायला पाहिजे होते, असा टोला आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना मारला.

आमदार रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी येथे काहीकाळ थांबून माध्यमांशी संवाद साधला. माजी नगरसेवक सौरभ पाटील, समीर कुडची, संजय पिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. महाशक्तीच्या विरोधात आज आम्ही लढत आहोत.

पवारसाहेबांचा संदेश घेऊन कोल्हापूरला चाललो आहे, असे सांगून आमदार पवार म्हणाले, ‘‘कांदा निर्यातीचा घेतलेला निर्णय व त्यावर लावलेला निर्यात शुल्क हा घाईगडबडीमध्ये घेतलेला निर्णय आहे. राज्य सरकारमध्ये क्रेडिट घेण्यासाठी सर्वच पुढारी धडपडत आहेत. हे सरकार एक आहे असे सर्व जण म्हणतात; परंतु तिन्ही पक्षांचे चेहरे वेगवेगळ्या दिशेला आहेत. केंद्राने कांदा निर्यातीवर बंदी आणल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल.

महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिकमध्ये जेव्हा कांद्यावरून शेतकरी आक्रमक झाले तेव्हा राज्याचे कृषिमंत्री केंद्रीय मंत्र्यांना भेटायला गेले. जपानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा केंद्रीय मंत्र्यांना फोन केले. मग मुख्यमंत्र्यांचा कृषिमंत्र्यांवर विश्वास नाही असे स्पष्ट होते. यात तिघांनी वेगवेगळ्या पद्धतीने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. सरकारमध्ये कुठेतरी ताळमेळ नाही.

पत्रकार परिषद घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या शेजारीच बसले होते. या पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील नेत्यांना बरे वाटावे म्हणून त्यांची वाहवा केली. केंद्रातील नेत्यांची वाहवा करताना शरद पवार साहेबांनी कधीही असा निर्णय घेतला नाही, असे म्हटले. तेव्हा शेजारी बसलेल्या अजित दादांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले आहे, हे विचारायला पाहिजे होते.’’

पवार पुढे म्हणाले, ‘‘दोन लाख टन नाफेडकडून कांदा खरेदी करून काही उपयोग होणार नाही. केवळ बातम्या होतील कार्यकर्त्यांना बोलायला संधी मिळेल, वातावरण निर्माण करतील; परंतु आता नाफेडकडे तीन लाख टन कांदा आहे तो विकणार असल्याचे म्हणत आहेत तेव्हा दोन लाख टन खरेदी करणार आणि तीन लाख विकणार अशावेळी मार्केटची परिस्थिती काय होणार याचा अभ्यास त्यांनी केला आहे का? सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणी कळतात का? केंद्रातील नेत्यांचे वाहवा करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT