mla shahajibapu patil on sharad pawar critisize uddhav thackeray in saswad maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

शहाजी पाटलांकडून शरद पवाराचं कौतुक अन् उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

सासवड : एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि शिवसेना पक्षात उभी फुट पडली . दरम्यान शिवसेना आणि शिंदे गटा यांच्याकडून कमेकांवर आरोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. आम्ही बंडखोरी केली नाही तर पक्षात उठाव केल्याचा दावा शिंदे गट करत आहे तर आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप ठाकरेंकडून वारंवार केला जात आहे. यादरम्या सांगोल्याचे आमदार शाहाजी पाटील यांनी शरद पवार यांची स्तुती करत उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सासवड येथील मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात शहाजीबापू पाटील बोलत होते.

सांगोल्याचे बंडखोर आमदार शाहीजी पाटील म्हणाले की यांनी मागच्या दोन महिन्यांपासून कोण आम्हाला बंडखोर म्हणतं आहे, कोणी उठाव केला तर कोण गद्दार, कोण खुद्दार म्हणतं आहे. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते म्हणून दे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाला जगाच्या पाठीवर दैदिप्यमान दिपवून टाकणारी ही क्रांती आहे हे लक्षात ठेवा असे सुनावले.

पुढे बोलताना शाहाजीबापू पाटील म्हणाले की, शरद पवार यांना जगातील सर्वात मोठा आजार कँसर आहे. गेली बावीस वर्ष ते काम करतायत. तरीही सकाळी पाचला उठून काम सुरूच ठेवतात. त्यांनी कधी आजाराचं कारण दिलं नाही. दुसरीकडे आमचं.. ओरडतायंत आम्हाला शिव्या देतायत, आजरपण असतंय, असावं, तुम्हाला भगवंताने द्यायला नको होतं, दुर्दैवाने दिलं मान्य आहे, पण तुम्ही व्यवस्था करायला हवं होतं. सहा महिने इनचार्ज एकनाथ शिंदे यांना करायला हवं होतं असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मी आजारी असताना घात केला अशी टीका बंडखोर आमदारांवर केली होती. पुढे बोलताना पाटील पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही आनंदाने स्वीकारलं. पण अडीच वर्षात काय झालं आमचं? सगळी माध्यम, सगळे लोक म्हणतात एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेवून गेले. एकनाथ शिंदेंनी बंड केले. पण तुम्हा सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, आम्ही ४० जण एकनाथ शिंदेंना घेवून गेलो, एकनाथ शिंदेंनी आम्हाला नाही नेले. तरीसुद्धा मी साडेतीन तास आधी सुरतमध्ये पोहचलो होतो. त्यानंतर एकनाथ शिंदे आले, असे शहाजी पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: दिवाळीत शेअर बाजारात जोरदार वाढ; निफ्टी-सेन्सेक्स तेजीत, बँक निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक

वन नाईट स्टॅंडनंतर गर्भवती राहिली अभिनेत्री, नंतर जे घडलं त्यावर अभिनेत्री म्हणाली...'भयंकर ब्लीडिंग...'

Diwali 2025: हिंदू शास्त्रांनुसार 'या' 4 रोपांजवळ दिवा लावल्यास वाढते सौभाग्य

Gopichand Padalkar : 'आता कोणालाही सुटी नाही, संघर्ष अटळ असेल'; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना थेट इशारा

IND vs AUS : 'अरे, बॉलिंगवर पण लक्ष द्या'! आर अश्विन संतापला, गौतम गंभीरच्या रणनितीचे केले पोस्टमॉर्टम Video

SCROLL FOR NEXT