Raj Thackeray vs Shashikant Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

'शरद पवारांच्या त्या सभेनं भाजपची सत्ता उलथवली याचा राज ठाकरेंना विसर'

सकाळ डिजिटल टीम

'पवार साहेब जाणीवपूर्वक पावसातल्या सभेत भिजलेले नव्हते.'

सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी (Shashikant Shinde) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय. साताऱ्यातील 'त्या' सभेत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) बोलण्यास उभे राहिले अन्‌ पाऊस सुरू झाला. त्यांचं भाषण संपल्यानंतर पाऊस कमी झाला. हे निसर्गाचे संकेत होते. हे राज ठाकरेंना (Raj Thackeray) माहित नसेल. पण, पवारसाहेबांनी पावसात भिजत दिलेल्या संकेतातूनच भाजपची (BJP) सत्ता जनतेनं उलथवून टाकली, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी केलीय.

दरम्यान, साताऱ्यातील (Satara) पावसातील सभेवर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार शिंदेंनी सडेतोड उत्तर दिलंय. शशिकांत शिंदे म्हणाले, 'राज ठाकरेंनी साताऱ्यातील पावसातील सभेवरून पवार साहेब यांच्यावर टीका केली. ही टीका पूर्णपणे चुकीची व हास्यास्पद आहे. पवार साहेब हे जाणीवपूर्वक सभेत भिजलेले नव्हते. तीस हजारांवर जनसमुदास सभेस उपस्थित होता. सभेपूर्वी पाऊस नव्हता, पण पवार साहेब सभेत बोलण्यास उभे राहिले अन्‌ पाऊस सुरू झाला. त्यांनी पावसाला सांगितलं नव्हतं की, मी आलो की पाऊस सुरू करा. ते नैसर्गिक वातावरण होतं. पवार साहेबांचं भाषण संपल्यानंतर पाऊस कमी झाला. हे निसर्गाचे संकेत होते. हे राज ठाकरेंना माहित नसेल.'

अनेक लोक या पावसाच्या सभेवर जाणीव पूर्वक भिजल्याची टीका करतात. मुळात या सभेतूनच भाजपला बाजूला काढण्यासाठी संकेत पवार साहेबांनी दिले होते. या सभेला मीही उपस्थित होतो. पाऊस मोठ्याप्रमाणात होता. लोक भिजत सभा ऐकत होते. त्यामुळे हे सर्व ठरवून झालेले नव्हते, नैसर्गिक होते. यातूनच काहीजण पवार साहेब व पावसांवर राग काढत असले तरी त्यांचं दु:ख आम्हाला माहितीय. ती नैसर्गिक परिस्थिती होती. काही लोक ठरवून सांगतात, ते धादांत खोटे आहे. साहेबांनी उत्स्फूर्तपणे भाषण केलं त्यातूनच पावसानं दिलेल्या संकेतातूनच भाजपची सत्ता जनतेनं उलथवून टाकलीय, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT