Politics 
महाराष्ट्र बातम्या

"भाजपवाले फक्त..."; संजय राऊतांच्या भावाचं वादग्रस्त वक्तव्य

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपावर आक्षेपार्ह टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस ढवळून निघताना दिसत आहे. सध्या राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्द्यांवरून टोलेबाजी सुरु आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. दरम्यान, आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Ruat) यांचे बंधु सुनील राऊत (Sunil Raut) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपावर (BJP) आक्षेपार्ह टीका केली आहे.

आमदार सुनील राऊत यांच्या या वक्तव्यामुळे भाजपा नेते आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. एखाद्या जाहीर सभेत त्यांनी असं आक्षेपार्ह वक्तव्य करणं योग्य नाही अशीही प्रतिक्रिया येत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वादाला तोंड फुटणार का अशी चर्चा सुरु आहे. यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले आहेत

भाजपावाले फक्त पैसा शोधत आहेत. आमच्याजवळ पैसा नाही तर तुमच्यासारखे खंबीर कार्यकर्ते आहेत. जे करायला हवे ते भाजपा करत नाही, असेही ते म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी काही अपशब्दही वापरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

SCROLL FOR NEXT