vinay kore Esakal
महाराष्ट्र बातम्या

महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; विनय कोरे

आमदार विनय कोरे : भावनेच्या भरात झालेली सर्वात मोठी चूक

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur)महानगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर असवा यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35-35 लाख दिले. भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चुक असल्याची कबुली देत सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारणा बद्दल तिरस्कार निर्माण होईल, असे राजकारण बंद झाले पाहिजे, यासाठी विधान परिषदेची निवणडूक बिनविरोध करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला यश आल्याची माहिती आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांनी आज दिली.

पेठ वडगाव (ता. हातकणंगले) बाजार समितीची निवडणूक आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार महादेवराव महाडिक, आरोग्य राज्यंमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकत्रित लढणार असल्याचेही श्री कोरे यांनी सांगितले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी श्री कोरे यांनी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, नेत्यांना आवाहनही यावेळी केले आहे.

आमदार कोरे म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेत जनुसराज्य पक्षाचा महापौर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) हे एकत्र होते. तर, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan MUshrif)आणि मी स्वत: एकत्र होतो. महानगरपालिकेत नगरसेवकांना लाखो रुपये दिल्यामुळे सर्वसामान्य माणसांकडून आपला आदर कमी होणार आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची राजकीय इर्षा कमी होणार आहे.

राजकारणाचा पावित्र राखले पाहिजे. लोकांकडून चांगला प्रतिनिधी निवडला पाहिजे. लोकांकडून आपल्याला आदर मिळणार नसेल तर चांगला समन्वय आणि चांगल्या विचाराने राजकारण करता येईल का? हा प्रामाणिक प्रयत्न केला आणि परमेश्‍वराच्या कृपेने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. कोणत्याही निवडणूका लोकशाहीनेच झाल्या पाहिजेत. त्याचे पावित्र्य जपले पाहिजे. असेही कोरे यांनी सांगितले. यावेळी, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivali News : कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Niphad Crime : अंध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी

Akola News : महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर; राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारीत तारखा जाहीर

Murlidhar Mohol : महापालिकेची निवडणूक वेळेत होईल; मुरलीधर मोहोळ यांचा दावा

Latest Marathi News Live Update: करवाढीवर सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी

SCROLL FOR NEXT