MNS amit thackeray opposes metro carshed in aarey writes fb post for aarey forest  
महाराष्ट्र बातम्या

...तर राजकारण करायला माणूसच शिल्लक राहणार नाही - अमित ठाकरे

आरे कारशेडच्या बाबतीत सध्या आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधु अमित ठाकरे यांचं एकमत झाल्याचं दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मागील काही वर्षांपासून आरे येथील मेट्रो कारशेडबाबत वाद सुरू आहे, फडणवीस सरकराच्या काळात झालेल्या या निर्णयाला सर्व स्तरातून जोरदार विरोध करण्यात आला होता, शिवसेनेने विरोध केला आणि मविआ सरकारच्या काळात हे काम थांबवण्यात आलं. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं आणि नव्या सरकारकडून पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आधीच्या सरकारचा आरे मेट्रो कारशेडचा निर्णय बदलण्यात आला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरेतच होणार असे संकेत दिले. दरम्यान या आरे कारशेडच्या बाबतीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधु तसेच मनसेचे नेते अमित ठाकरे यांचं एकमत झाल्याचं दिसून येत आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आरे जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याला सुरुवातीपासून पर्यावरणवादी गटाची बाजू घेत, आरे येथील कारशेडचा निर्णयाविरोधातील भूमिकेला पाठिंबा दिला होता. आता या लढाईत अमित ठाकरे देखील उतरले आहेत, त्यांनी नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडबाबत पुनर्विचार करावा असे आवाहन करत सोशल मिडीयावर पोस्ट लिहिली आहे.

अमित ठाकरे यांनी फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ज्यमध्ये त्यांना मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत. पुढे त्यांनी "आरेमध्ये कार शेड होऊ नये म्हणून शेकडो तरूण-तरूणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होत.." असेही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

विकास हवा पण पर्यावरण उद्ध्वस्त करून नको असे, सांगताना अमित ठाकरे म्हणाले आहेत की, "आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्धवस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहाणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं."

अमित ठाकरे यांनी नुकतेच सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत, "नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती" असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT