Rahul Gandhi and Raj Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

भारत जोडोमधील राहुल गांधींच्या 'त्या' कृतीवर 'मनसे'ही फिदा; ट्विटने वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारतजोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यात्रेच्या पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांचा साधेपणा आणि आपुलकीने सर्वांच्या मनावर प्रभाव टाकला आहे. राहुल गांधी नेहमीच बेधक भूमिका आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्वांना भावतात. त्यातच त्यांनी भारत जोडो यात्रेत केलेल्या कृतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील भारावली आहे. (Rahul Gandhi News in Marathi)

भारत जोडो यात्रेत दोन चिरमुरड्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर कम्प्युटर इंजिनियर होण्याचं आपलं स्वप्न असल्याचं म्हटल होतं. त्यावर राहुल यांनी मुलांना तुम्ही कम्प्युटर पाहिलं का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर मुलं म्हणाले की, आम्ही कधीही कम्प्युटर पाहिलं नाही. त्यानंतर मुलांनी कम्प्युटरच पाहिला नाही, तर इंजिनियर कसे होणार हे लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी दोघांना लॅपटॉप भेट दिले.

या संदर्भातील फोटो राहुल गांधींने नव्हे तर काँग्रेसच्या नेत्यांनी शेअर केले. राहुल यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी देखील राहुल गांधी यांचं कौतुक करणारं एक ट्विट केलं आहे.

गजानन काळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे स्वप्न बाळगणाऱ्या नांदेडच्या सर्वेश हाटणेला परिस्थितीमुळे कॉम्प्युटर सुध्दा पाहता आला नाही हे लक्षात ठेवून त्याला राहुल गांधी यांनी आज कॉम्प्युटर भेट दिला... राजकारण चालत राहील पण ही संवेदनशीलता कायम अशीच राहो...

राहुल गांधी अनेकांना मदत करतात, हे याआधीही स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी यांनी याआधी दिल्लीतील निर्भयाच्या भावाच्या वैमानिक होण्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. याबाबत निर्भयाच्या आईनेच खुलासा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT