Hemant Gadkari Esakal
महाराष्ट्र बातम्या

हेमंत गडकरी म्हणाले, हनुमान चालिसा पठण मंदिरात करू; पण...

मस्जिद वर लागलेले अवैध भोंगे काढण्याचे निवेदन दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणात मशीदीच्या समोर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावा, असे आदेश दिल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले आहेत. दरम्यान मस्जिद वर लागलेले अवैध भोंगे काढण्याचे निवेदन मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी (Hemant Gadkari) यांच्या नेतृत्वात नागपूर (Nagpur) पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहे.

हायकोर्टच्या आदेशच पालन करत हे भोंगे काढण्यात यावे असे या निवेदनात म्हटलं आहे. तसेच हनुमान चालिसा पठण आम्ही मंदिरात करू. मात्र त्या समोर मस्जिद असेल तर, आम्ही काही करू शकत नाही असेही निवेदनात म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. राज ठाकरेंनी 'यू टर्न' घेतला असा टीकेचा सूर उमटला आहे. मशीदीच्या समोर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावा, असे आदेश ठाकरेंनी दिले. यानंतर राज्यात धार्मिक द्वेष वाढीस लागत असल्याचं बोललं जातंय.

मुंबईच्या कुर्ल्यात मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचं म्हटलं जातय. काही ठिकाणचे भोंगे देखील उतरवण्याची तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र, पुण्यात काही मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT