MNS
MNS 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : मनसेची लोकसभेतून माघार; बाकी 19 मार्चला बोलूच केले जाहीर

सकाळवृत्तसेवा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज (रविवार) जाहीर केला. तसेच त्यांनी यावेळी बाकी 19 मार्चला बोलू असेही स्पष्ट केले आहे.

मनसे नेते शिरीष सावंत यांनी आज पत्रक प्रसिद्ध करत मनसेची भूमिका स्पष्ट केली. या पत्रकात त्यांनी मनसे यंदाची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने काही ठिकाणच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून, युतीची यादीही लवकरच घोषित होणार आहे. मात्र राज्यातील समीकरणे बदलवण्याची ताकद असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका स्पष्ट केल्याने आघाडीला मनसे मदत करणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर कॉंग्रेस आघाडीसोबत मनसेचा समझोता होईल, अशी चर्चा होती. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अनुकूल होती; मात्र कॉंग्रेसने विरोध केला होता. दरम्यान, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 मार्च रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात नंतर भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी राज यांची भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT