Raj Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: मनसे लोकसभेच्या 22 जागा लढवण्याच्या तयारीत? संभाव्य उमेदवारांची नावंही चर्चेत

Maharashtra Political: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या अनुषगांने बैठका आणि इतर हालचाली मनसेने सुरू केल्या आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या अनुषगांने बैठका आणि इतर हालचाली मनसेने सुरू केल्या आहेत. मनसे लोकसभा निवडणुकीत पुर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं दिसून येत आहे.(Latest Marathi News)

मनसेची सोमवारी लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला आहे. मनसे मुंबईत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर काही जागांवरील संभाव्य उमेदावारांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, मनसे मुंबईतील सर्व सहा जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. तर ठाणे, कोकण येथे प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार देऊ शकते. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात देखील उमेदवार देण्याच्या तयारीत मनसे आहे. (Marathi Tajya Batmya)

एकूण 22 जागा कोणत्या?

  • मुंबई - ६

  • ठाणे- ३

  • कोकण -३

  • पुणे - ४

  • नाशिक - २

  • कोल्हापूर

  • सोलापूर

  • अमरावती

  • चंद्रपूर

या मतदार संघावर चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय बैठकीत नेत्यांची कानउघडणी करत जोमाने तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.(Latest Marathi News)

कोणती नावे चर्चेत?

दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांचं नाव चर्चेत आहे. मुंबईतीच्या सर्व जागी मनसेकडून उमेदवार दिले जाऊ शकतात. कल्याणमधून विद्यमान आमदार राजू पाटील यांचं नाव चर्चेत आहे. बारामती किंवा पुण्यातून वसंत मोरे तर सोलापूर मधून दिलीप धोत्रे यांच्या नावाची चर्चा आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT