mns Raj Thackeray shivsena Udhhav Thackeray interview  esakal
महाराष्ट्र बातम्या

साहेब’ जैसा जैसा बोले, हा तैसा तैसा चाले..उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची टीका

राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

धनश्री ओतारी

शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राऊतांनी अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांवर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, मनसेने या मुलाखतीवर ‘कार्टून’ शेअर करत टीका केली आहे.(mns Raj Thackeray shivsena Udhhav Thackeray interview)

संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. यात मुलाखतीसाठीचा स्टुडिओ दिसतोय. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्टूनमध्ये संजय राऊतांच्या हातामध्ये घड्याळ दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्टूनद्वारे केवळ राऊत ठाकरेसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याच्यावरही निशाणा साधला आहे.

“हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तरं”, असं संजय राऊत म्हणतात. “त्यावर बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं”, असं उद्धव ठाकरे म्हणतात. असे कार्टूनमध्ये राऊत आणि ठाकरेंमध्ये संवाद दाखवल आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची ३० जूनला शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून त्यांच्यासह त्यांच्यासोबतचे आमदार शरद पवारांमुळे शिवसेनेत उभी फुट पडली असल्याचा आरोप सातत्याने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT