Amit Thackeray
Amit Thackeray esakal
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या नातवाचा पहिला फोटो आला समोर, वडिलांनीच शेअर केली झलक

सकाळ डिजिटल टीम

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवसेना-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवल्यानंतरही राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मात्र या सगळ्या वातावरणात आता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आनंदाचा सोहळा सुरू झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा झाले असून चिरंजीव अमित ठाकरे व सूनबाई मिताली ठाकरे यांना पुत्ररत्न झाले आहे. या गोड बातमीमुळे ठाकरे कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, अमित ठाकरेंनी रविवारी त्यांच्या बाळाचा फोटो फेसबुकवरुन शेअर केला आहे. ठाकरे कुटुंबीयांनी आनंदाने छोट्या पाहुण्याचे स्वागत केले. आता अमित ठाकरे यांनी बाळाचा पहिला गोंडस फोटो शेअर केला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज ठाकरेंना नातू झाला ही बातमी कार्यकर्त्यांमध्ये पसरताच मोठा उत्साह साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी राज ठाकरेंची सून मिताली ठाकरे यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

मुंबईतील ब्रीच कँन्डी हॉस्पिटलमध्ये आई-मुलगा दोघंही सुखरुप आहेत. अमित ठाकरेंना पुत्ररत्न झाल्याचं समजताच शिवतीर्थावर पेढे वाटप करण्यात आले. नातवाच्या आगमनाने राज ठाकरे आजोबा तर शर्मिला ठाकरे या आजी झाल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वीच राज यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली होती. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी काही आठवड्यांपासून सुरु होती.

२७ जानेवारी २०१९ रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला होता. लोअर परळमधील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांचे वडिलही प्रसिद्ध सर्जन आहेत. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT