Sachin Patil
Sachin Patil Sakal
महाराष्ट्र

MNS Sachin Patil Murder: परभणी मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा खून

सकाळ डिजिटल टीम

परभणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्यावर सोमवारी (ता.5) मध्यरात्री जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दुर्दैवाने या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान त्यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(MNS Parbhani Chief Sachin Patil Murder Updates)

दरम्यान, परभणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील हे काही मित्रांसह वसमत रोड परिसरातील शिवराम चित्र मंदिराच्या बाजूस रात्री गप्पा मारत बसले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून एका व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत सचिन पाटील यांना समोरच्या व्यक्तीने चाकूने भोसकले. या हाणामारीत त्यांच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परभणी शहरात खळबळ उडाली आहे.

ही हाणामारी राजकीय वादातून झाली असावी का याचा अंदाज पोलीस घेत आहेत. घटनास्थळी परभणीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, नवा मोंढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. घटनास्थळावर लोकांची गर्दी जमली आहे. याप्रकरणी अद्याप कुणाचीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT