Sandeep Deshpande Criticizes Thackeray Government  google
महाराष्ट्र बातम्या

राज्यात सत्ता यांची अन् घाबरतात आम्हाला, मनसेचा ठाकरे सरकारला टोला

राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला, हा सगळा केविलवाणा प्रयोग असतो

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला, हा सगळा केविलवाणा प्रयोग असतो

मनसेप्रमुखे राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये १ मे ला सभा होणार आहे. या सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत ही सभा होणार असल्याचे मनसे पदाधिकारी आणि नेत्यांनी सांगितले आहे. औरंगाबादसह सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर औरांगाबादमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २६ एप्रिल ते ९ मे या काळात पोलिसांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे. त्यामुळे ही सभा होणार का नाही अशी चर्चा सुरु आहे. आता एक वगेळी बातमी समोर येत आहे. (Sandeep Deshpande Criticizes Thackeray Government)

मनसेचे नेते संदीप देशापांडे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला, असं वक्तव्य करणार राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. यात राज ठाकरे म्हणतात, सभा आहे म्हणून शिवसेनेनं सगळीकडे झेंडे लावायला सुरुवात केली. आत्मविश्वास नसला की असं होतं, राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला, हा सगळा केविलवाणा प्रयोग असतो, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणार मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या होणारी सभा पोलिसांच्या आदेशामुळे रद्द करावी लागणार आहे. त्यामुळे आता यावर मनसे नेते याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागेल आहे. शहरातील पोलिस यंत्रणाने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सुरुवातीपासूनच या सभेला परवानगी नाकारली होती. तरीही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेने सभेची तयारी सुरु केली होती. आज मनसे सभेपूर्वीच पुण्याहून मागवले 50 भोंगे मागवले असल्याने याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News : सप्तशृंगी देवी यात्रेला सुरुवात,देवीच्या आभूषणांची पूजा

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT