Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

वारसा मैदानाचा नसतो...; दसरा मेळ्याव्याच्या परवानगीवरून मनसेचा चिमटा

दत्ता लवांडे

मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद आता संपला असून काल (शुक्रवारी) मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात असून शिंदे गट याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(Sandeep Deshpande On Dasra Melava)

दसरा मेळाव्याची परवानगी मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या असून ‘‘दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी दसरा मेळाव्यासाठी उत्साहात, गुलाल उधळत वाजत गाजत या’’ असं ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत. तर 'वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो' असा टोला मनसेच्या संदीप देशपांडे यांनी लावला आहे.

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दसरा मेळाव्यासाठीच्या परवानगीवरून वाद सुरू होता. महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारल्यानतंर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तर काल झालेल्या सुनावणीत कोर्टाने महापालिकेविरोधात निर्णय देत ठाकरे गटासाठी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणे हा शिवसेनेचा वारसा आहे असं शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असून मनसेकडून आता शिवसेनेला डवचण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण भाजपशी युती करणार नसल्याचं मनसेने स्पष्ट केलं होतं. येणाऱ्या निवडणुकांत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता असून विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT