MNS sandip deshpande on cm uddhav thackeray  
महाराष्ट्र बातम्या

'वेषांतर करुन तर पहा म्हणजे....' मनसेच्या संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

चाळीसच्या वर आमदार सोडून गेले, त्या विरोधात कुठे ही शिवसैनिकांमध्ये उद्रेक नाही

सकाळ ऑनलाईन टीम

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आता अधिक तीव्र झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही अडचणीत सापडले आहे. शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. यादरम्यान शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावर मनसेचे संदीप देशपांडेने मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे. (MNS sandip deshpande on cm uddhav thackeray)

नुकतेच उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये उद्धव ठाकरे राजीनाम्याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. पण उद्धव ठाकरे CM पदी नको हे समोर येऊन सांगावं, असं त्यांनी बंड करणाऱ्या आमदारांना सांगितलं आहे. त्यावर संदीप देशपांडेने ट्विट करत लिहिले की, "चाळीसच्या वर आमदार सोडून गेले, त्या विरोधात कुठे ही शिवसैनिकांमध्ये उद्रेक नाही अजून किती स्पष्ट सांगायचं. पूर्वी राजा वेषांतर करून स्वतःबद्दल ची मत जाणून घ्यायचे, एकदा तसं करून बघा जनतेच्या भावना नक्की समजतील, मराठी माणूस भावनिक आहे पण मूर्ख नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muslim Reservation: मुस्लिमांसाठी ५% आरक्षण रद्द; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान, सुनावणी कधी होणार?

SIR expansion : 'SIR'बाबत मोठी घोषणा!, आता २३ राज्यांमध्ये राबविली जाणार प्रक्रिया

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगामुळे 5 राशींना 'या' आठवड्यात नोकरीत मिळणार प्रोमोशन आणि पैशांची होणार बरसात

निर्लज्ज! IPL फ्रँचायझींनी लायकी दाखवली, तरीही ६३ पाकिस्तानी खेळाडूंनी लिलावासाठी नावं नोंदवली... बाबर, रिझवान शहाणे निघाले

'माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाहीये तर... रितेश देशमुखने सांगितलेलं खरं नाव, म्हणालेला- चुकीचं नाव...

SCROLL FOR NEXT