Vasant More esakal
महाराष्ट्र बातम्या

Vasant More: "साहेब तुम्ही बसा, मी मागे...'' वसंत मोरेंच्या विधानाची रंगली चर्चा

नाराज वसंत मोरे राज ठाकरेंसोबत दिसल्याने चर्चेला उधाण

सकाळ डिजिटल टीम

मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी मनसेच्या तीन कार्यालयांची उद्घाटनं त्यांच्या हस्ते करण्यात आली. या उद्धाटनं कार्यक्रमाला मनसेचे नाराज नेते वसंत मोरे हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी यावेळी केलेलं वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. (MNS Vasant More Raj Thackeray Pune Maharashtra Politics)

धायरी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना राज ठाकरे यांच्या मागे नाराज वसंत मोरे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एका पत्रातून वसंत मोरेंवरच निशाणा साधला होता. त्यानंतर मोरे यांनी राजकारण सोडण्याची भाषा अप्रत्यक्षपणे केली होती. दरम्यान, आज दोघे एकत्र दिसल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

धायरी येथील कार्यलय उद्घाटन सोहळा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. खडकवासला मतदारसंघाची जबाबदारी ज्या वसंत मोरेंवर आहे, ते मोरे राज ठाकरेंच्या खुर्चीला धरुनच उभे दिसले. यावेळी एक किस्सा घडला.

काय घडला किस्सा?

राज ठाकरे उद्घाटन करून कार्यालयात आले. त्यावेळेस खुर्चीवर बसताना त्यांनी मिश्कील प्रश्न विचारला, "खुर्ची व्यवस्थित आहे ना?, मागे कोणाची तरी खुर्ची तुटली होती." राज ठाकरेंच्या या प्रश्नावर वसंत मोरेंनी लगेचच उत्तर दिले. "चंद्रकांत पाटील यांची तुटली होती." तसेच, "साहेब तुम्ही बसा, मी मागे आहेच...", असं मोरेंनी राज ठाकरेंना म्हटलं. राज ठाकरेंनी पाठीमागे वळून पाहात वसंत मोरेंवर कटाक्ष टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT