Raj Thackeray Khed Chiplun esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरेंची मोठी घोषणा; मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी!

सध्याच्या राजकीय उलथापालथीमुळे राज्यातील प्रत्येक मतदाराला जो त्रास झाला आहे तो सर्वांनी निवडणुकीत व्यक्त करणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या महाराष्ट्रात कॅरमच्या सोंगट्या कोणत्या भोकात जात आहेत हेच कोणाला कळेनासे झाले आहे.

खेड : आगामी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद (ZP Election), पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) स्वबळावरच लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खेडमधील कार्यकर्ता मेळाव्यात केली.

मनसे नेते राज ठाकरे चिपळूण येथून मुंबई-गोवा महमार्गाची पाहणी करत गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास खेडमध्ये दाखल झाले. ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत भरणेनाका येथून बाईक रॅलीने त्यांचे शहरातील वैश्य भवन येथील मेळाव्याच्या ठिकाणी आगमन झाले. या वेळी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, अनिल शिदोरे, अविनाश जाधव, वैभव खेडेकर आदी उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, ''मनसेचा हा कोकणदौरा पूर्णपणे पक्षबांधणीसाठी आहे. गेल्या पाच-सात वर्षात आपण सगळ्यांनी मोठमोठी भाषणे ऐकली; पण सध्या महाराष्ट्रात कॅरमच्या सोंगट्या कोणत्या भोकात जात आहेत हेच कोणाला कळेनासे झाले आहे; मात्र माझा एकही कार्यकर्ता कुठेही गेला नाही हीच मनसेची ओळख आहे.

सध्याच्या राजकीय उलथापालथीमुळे राज्यातील प्रत्येक मतदाराला जो त्रास झाला आहे तो सर्वांनी येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत व्यक्त करणे गरजेचे आहे. जर तो त्यांनी मतदानातून व्यक्त केला नाही, तर त्यांच्यासारखे अभागी तेच असतील. येत्या निवडणुकीत आपण मागील पालिका निवडणुकीत जे झालं ते विसरून मनसे यापुढील निवडणुका स्वबळावरच लढवणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आता मनसे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. यापुढेही होणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा होणार आहेत. यामधून कोकणवासीयांना केवळ स्वप्न नव्हे वेगळे काही साकारता येईल, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तर गुणवंत विद्यार्थी आणि सेवाभावी संस्थांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

महामार्ग अपूर्ण, चीड येत नाही का?

गेली कित्येक वर्षे आपण रांगेत उभे राहून आमदार, खासदारांना निवडून देत आहोत; मात्र या वेळी प्रत्येक मतदारांनी याचा विचार करावा की, समृद्धी महामार्ग जर साडेचार वर्षात होऊ शकतो तर गेल्या १७ वर्षात आपला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग का होऊ शकत नाही? याचा जाब तुम्ही विचारला पाहिजे. याची तुम्हाला चीड येत नाही का? असे सांगून मी तुम्हाला जस सांगतोय ते वर्तमानातील आहे. भविष्यातील तुमच्या पिढ्यांचा तुम्ही विचार करा, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT