Sandip Deshpande Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंवरील हल्ल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया; एकटं पाहून...

संतोष कानडे

मुंबईः मनसेचे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज भल्या पहाटे हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

संदीप देशपांडे हे मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत होते. त्यांना एकटं पाहून तोंडावर मास्क लावलेले चौघे तिथे आले. त्यांनी संदीप यांच्यावर हल्ला सुरु केला. हातातल्या स्टंपने त्यांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न झाला.

संदीप देशपांडे यांनी प्रतिकार करत आपल्या हातावर मार झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. मनसेचे वरिष्ठ नेते रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत.

या प्रकरणी मनसे नेते संतोष धुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा एक भ्याड हल्ला आहे. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कमध्ये फिरत होते. त्यांना एकट्याला बघून हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र देशपांडेंनी धीटपणे प्रतिकार केल्याने त्यांना जास्त मार लागला नाही.

दरम्यान, हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा मनसेकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. संदीप देशपांडे हे आक्रमकपणे विधानं करण्यासाठी ओळखले जातात. मात्र हा हल्ला नेमक्या कुठल्या कारणाने झाला, हे समजू शकलं नाही. सध्या संदीप देशपांडे यांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Alert : घाटमाथ्यापासून विदर्भापर्यंत मुसळधार पाऊस धडकणार; 'या' 17 जिल्ह्यांत यलो अलर्ट; आजचा दिवस ठरणार धोकादायक?

Maratha Reservation: सीएसएमटी स्थानकात आंदोलकांची मोठी गर्दी, रुळावरही उतरले; हलगी वाजवत निषेध व्यक्त

Live Breaking News Updates In Marathi: जरांगेंच्या आंदोलनाला दिलेली परवानगी आणि अटींची पडताळणी सुरू

Online Gaming Bill: ही कंपनी आपल्या 60 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; सीईओ म्हणाले- 'आता पर्याय नाही...'

Manoj Toomu Meta : 23 वर्षांच्या भारतीय इंजीनियरला साडेतीन कोटी पगार, 'या' खास कौशल्यामुळे मेटाने त्याला दिली नोकरीची ऑफर

SCROLL FOR NEXT