mobile battery explosion esakal
महाराष्ट्र बातम्या

मोबाईल बॅटरीचा स्फोट; 6 वर्षांची चिमुरडी जखमी, जेजे रुग्णालयात उपचार सुरु

संतोष कानडे

मुंबईः मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन एक चिमुकली जखमी झाल्याची घटना घडली आहे. या चिमुकलीवर मुंबईतील जेजे रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील आंबिवली गावात ही घटना घडली आहे. मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. या घटनेमध्ये होवून 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. अनिता वाघमारे असे तिचे नाव असून तिच्या तोंडाला दुखापत झाली आहे.

महाड येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता तिच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत.

मोबाईल बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून कमी झालेल्या आहेत. काही जुने मोबाईल आणि जास्तवेळ सुरु असलेल्या मोबाईलचे स्फोट होत आहेत. अशीच घटना आंबिवली गावात घडली सहा वर्षांची चिमुरडी जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरु आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT