Ramdas Athawale
Ramdas Athawale esakal
महाराष्ट्र

Ramdas Athawale : 'वाटेल ते झालं तरी चालेल, मात्र मोदी सरकारला बाबासाहेबांचं संविधान बदलू देणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

राज्यात भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्षासोबत राष्ट्रवादीचे अजित पवार सहभागी झाल्याने आता आमचा आकडा दोनशे पार झाला आहे.

जत : राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होत आहे. विविध पक्षांतील आमदार सत्तेत सहभागी होत आहेत. अजित पवार यांनीही चांगला निर्णय घेतला आहे, असं मत रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केलं.

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. राज्यात भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्षासोबत राष्ट्रवादीचे अजित पवार सहभागी झाल्याने आता आमचा आकडा दोनशे पार झाला आहे. देशही मोदींच्या नेतृत्वाखाली एकवटत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

जतमध्ये रस्ता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे सभागृहाचे उद्‌घाटन केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव विवेक कांबळे, सुरेश बारशिंगे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशन महामंडळाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे पाटील, विकास साबळे, सुभाष कांबळे, प्रा. हेमंत चौगुले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशात अनेक राज्यांत रिपब्लिकन पक्ष पोहोचला आहे. नागालँडमध्ये दोन उमेदवार निवडून आले. मेघालाय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशसह अन्य राज्यांत पक्षाची ताकद वाढली आहे. सर्व जाती-धर्माचे लोक पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहनही श्री. आठवले यांनी केले.

राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, मोदी सरकार संविधान बदलेल असे गैरसमज दलित समाजात पसरविले जात आहेत. मात्र, बाबासाहेबांनी निर्माण केलेले संविधान हे आपल्यात बदल घडविण्यासाठी आहे. आज मी सभागृहात आहेत, वाटेल ते झालं तरी चालेल. मात्र बाबासाहेबांचे संविधान बदलू देणार नाही, अशी ग्वाही दिली. शिवाय, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांना पाणी देणे, महिलांचे प्रश्न सोडविणे, यासह प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सक्षम काम केले पाहिजे.

खासदार संजय पाटील म्हणाले, सध्या पाऊस लांबला आहे. पाण्याचे व जनावरांच्या वैरणीचे हाल सुरू आहे. पश्चिम भागात ‘म्हैसाळ’चे पाणी आल्यामुळे समाधान असले तरी पूर्व भागातील विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पूर्णत्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. लवकरच ते पूर्ण करतील. शिवाय, जतच्या दुष्काळी जनतेला पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे बैठक लावून जतच्या जनतेला न्याय देण्याचे काम करू.

संजय कांबळे म्हणाले, राज्यासह देशातील दलित समाजावरील अन्यायाला एकमेव वाचा फोडण्याचे काम आठवले यांनी घेतले आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांना न्याय व हक्कासाठी पुढाकार घेतला. आज शहरात रस्ता व सभागृहासाठी ‘नगरविकास’च्या योजनेतून एक कोटींचा निधी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Lok Sabha: '500 रुपये एका मताची किंमत'; अमोल कोल्हेंनी व्हिडिओ शेअर करत केला मोठा दावा

Mamata Banerjee: ममतांनी सांगितलं NDA अन् INDIAला किती जागा मिळणार; म्हणाल्या, कालच...

Rohit Sharma: फक्त रोहितचाच जलवा! सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडियाची T20 जर्सी लाँच, पण हार्दिककडे दुर्लक्ष, पाहा Video

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

Mumbai Rain Accident: घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले, जवळपास 80 गाड्या दबल्या, अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT