solapur city police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

मुंबईतून पुणे आणि तेथून सोलापुरात एमडी ड्रग्ज घेऊन येणाऱ्यांची एक साखळी तयार झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांची या साखळीवर नजर आहे. पोलिसांची ही नजर चुकविण्यासाठीच मोहम्मद अहझर हैदरसाहेब कुरेशी (वय ३७, रा. भिमपुरा लेन, सेंटर स्ट्रिट कॅम्प, पुणे) हा एमडी ड्रग्ज एसटीने सोलापुरात घेऊन आला होता. पोलिसांनी साफळा रचून त्याला बसस्थानकावर पकडले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुंबईतून पुणे आणि तेथून सोलापुरात एमडी ड्रग्ज घेऊन येणाऱ्यांची एक साखळी तयार झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांची या साखळीवर नजर आहे. पोलिसांची ही नजर चुकविण्यासाठीच मोहम्मद अहझर हैदरसाहेब कुरेशी (वय ३७, रा. भिमपुरा लेन, सेंटर स्ट्रिट कॅम्प, पुणे) हा एमडी ड्रग्ज एसटीने सोलापुरात घेऊन आला होता. पोलिसांनी साफळा रचून त्याला बसस्थानकावर पकडले. त्याच्याकडून शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ३६ ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे.

सोलापूर शहर पोलिसांनी सापळा रचून पकडलेला मोहम्मद अझहर हा यापूर्वी देखील एमडी ड्रग्ज घेऊन सोलापुरात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी त्याने कोणाला ड्रग्ज दिले होते? याचा शोध देखील सध्या सुरू आहे. दुसरीकडे आता तो ड्रग्ज कोणाला द्यायला आला होता? याचाही तपास सुरू आहे. ज्या व्यक्तीला तो ड्रग्ज देणारा होता, त्याच्यासोबत मोहम्मद अझहरने व्हॉट्‌सॲपवरून कॉल केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून त्यातून अनेक गुपिते उलगडू शकतात, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

दरम्यान, अझहरला न्यायालयाने ३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वातील सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे, उपनिरीक्षक श्यामकांत जाधव, अंमलदार बापू साठे, सैपन सय्यद, वसीम शेख, सुभाष मुंढे, अनिल जाधव, कुमार शेळके व सायबर पोलिसांकडील मच्छिंद्र राठोड, प्रकाश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

सापळा रचून पकडले

पोलिसांची नजर असल्याने मोहम्मद अझहर कुरेशी हा एसटीने पुण्यातून सोलापुरात आला होता. खबऱ्यांकडून आपल्याला तो एमडी ड्रग्ज घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला सोलापूरच्या एसटी स्टॅण्डवर सापळा रचून पकडले. एमडी ड्रग्ज सोलापुरात कोणाला द्यायला आला होता? याचा तपास सुरू आहे.

- अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे), सोलापूर शहर

सोलापुरातील अनेकजण नशेच्या आहारी

एमडी ड्रग्जचे व्यसन लागलेले सोलापूर शहरात खूपजण आहेत. त्यांना ठराविक दिवसांनी ड्रग्ज घ्यावेच लागते, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील एजंट (पुरवठादार) वेगवेगळ्या मार्गाने ड्रग्ज घेऊन येतात. काही दिवसांपूर्वी कर्णिक नगर परिसरात अमीर हामजा अकलाख दिना (वय ३०) या तरुणाकडे २९ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले होते. आता पुन्हा ड्रग्ज सोलापुरात घेऊन आलेला तरुण पोलिसांच्या हाती लागला आहे. ‘एमडी’चे व्यसन जडलेल्यांना त्याचा पुरवठा करणारी साखळी तयार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

लोककल्याणाची गाथा आणि भक्तीचा वसा ! अभंग तुकाराम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, या तारखेला रिलीज होणार सिनेमा

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Rohit Arya Encounter: 'बाथरुम'मधून पोलिस आत शिरले अन्.., कसा घडला किडनॅपरच्या एन्काऊंटरचा थरार?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली - वर्षा गायकवाड

SCROLL FOR NEXT