anant karmuse beating case karmuse assault case allegation on ncp jitendra awhad decision news esakal
महाराष्ट्र बातम्या

Mohit Kamboj : "जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या नव्हे, खून झालाय"

करमुसे मारहाण प्रकरणात या बॉडीगार्डने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली होती, असंही कंबोज म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अनंत करमुसे हत्या प्रकरणामुळे जितेंद्र आव्हाड यांची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. आव्हाडांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून खून आहे, असा आरोप आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक आणि मुंबई राखीव पोलीस दलातील कर्मचारी वैभव कदम याने आत्महत्या केली आहे. मात्र ही हत्या असल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. करमुसे प्रकरणात आधी आरोपी असणारा आणि आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदमचा मृतदेह सापडल्याने कंबोज यांनी शंका व्यक्त केली आहे.

कदम हा जितेंद्र आव्हाडांचा सुरक्षारक्षक होता. एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातल्या आरोपीचा असा संशयास्पद मृत्यू होतो. राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत सारखं प्रकरण झालंय, असा आरोप कंबोज यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ कारवाई करण्याची मागणी कंबोज यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT