mohit kamboj car attack devendra fadnavis criticized shivena says cowards relying on power  Sakal
महाराष्ट्र बातम्या

"मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे.."; देवेंद्र फडणवीसांची टीका

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यात भोंगे आणि हनुमान चालिसा या दोन मुद्द्यांवर राजकराण चांगलेच तापलेले आहे. यातच भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj Car Attack) यांच्या गाडीवर मुंबईत शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे, अशा शब्दात या घटनेचा निषेध केला आहे.

फडणवीस यांनी ट्विट करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर देखील हल्ला चढवला. त्यांनी "महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही." असे म्हटले आहे.

इतकेच नाही तर त्यांनी या हल्लेखोर दोषींवर कठोर कारवाईची करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. त्यांनी "आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार? मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच. या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे."

काल रात्री मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीसमोरुन जात असताना शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. कलानगर सिग्नल परिसरात मोहित कंबोज यांची गाडी थांबली होती. मोहित कंबोज यांच्याकडून या परिसराची रेकी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT