Mohit Kamboj
Mohit Kamboj esakal
महाराष्ट्र

गृहमंत्र्यांच्या निर्णयाचे मोहित कंबोज यांनी केले स्वागत; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर भोंग्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. मंदिर किंवा मशीदवर लाऊडस्पीकर लावण्यासंदर्भातचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) जाहीर केला. परवानगी असलेल्या लाऊडस्पीकरला डेसिबल मर्यादा ठरवून परवानगी द्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच निर्णयाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही वळसे-पाटील यांनी दिला. या निर्णयाचे स्वागत भाजप नेते मोहित कंबोज यांनी (Mohit Kamboj) केले आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

मशिदीवर लाऊड स्पीकर लावण्यासाठी जी नियमावली ठरवणार आहात तीच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकर बाबत ठरवावी.

मोहित कंबोज म्हणाले, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मंदिर किंवा मशीदीवरील लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावी असा निर्णय घेतला याबाबत त्याचे स्वागत करतो. याचबरोबर येत्या काळात मशिदीवर लाऊड स्पीकर लावण्यासाठी जी नियमावली ठरवणार आहात तीच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकर बाबत ठरवावी अशी विनंतीही केली.

पुढे ते म्हणाले, ज्या मशिदीवर अनधिकृत लाऊड स्पीकर आहेत त्यांना परवानगी देऊ नये. तसेच मदरशांवरील लाऊडस्पीकर देखील काढून टाकावेत. कारण ८० टक्के लाऊडस्पीकर हे मदरशांवर लावलेले आहेत. तर २० टक्के लाऊड स्पीकर हे मशिदीवर आहेत असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला विनंती करताना ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाचे नियम सरकारने योग्य रीतीने राबवावे. ध्वनी प्रदूषण ही एक खूप मोठी समस्या आहे. येत्या काळात मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवावे. याची सुरुवात ही मुंबईवरून व्हावी जेणेकरून देशाला दिशा मिळेल. आणि ही एक मोठी जनतेची सामाजिक चळवळ होऊन जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

मतदारांच्या फायद्याची बातमी! पत्ता बदलण्यासाठी ‘अर्ज क्र.8’ तर यादीत नाव समाविष्टसाठी भरावा लागतो अर्ज क्र. 6; ‘या’ संकेतस्थळावर आजच भरा अर्ज

Salman Khan house firing case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूचा कोर्टाने मागवला अहवाल; पोलीस कोठडीत संपवलं होतं जीवन

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सून होणार दाखल

National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT