Monsoon Increase in Maharashtra State
Monsoon Increase in Maharashtra State 
महाराष्ट्र

राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून दूपारनंतर जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. मॉन्सून सक्रीय नसल्याने स्थानिक पातळीवर बाष्पयूक्त ढगांची निर्मिती होत. कमी वेळेत जास्त पाऊस पडत होता. परंतु आता मात्र राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवाह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर आता पुन्हा सक्रीय झाल्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनुपम काश्‍यपि यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, 'आता उत्तर महाराष्ट्र ते केरळच्या किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी लगत बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच रविवारी (ता. 13) एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मॉन्सूनसाठी पोषक असे वातावरण तयार झाले असून राज्यात तो पुन्हा सक्रिय होणार आहे.'' पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता असेल, तर उत्तर किणारपट्टीलगत पुढील चोवीस तास सोसाट्याचा वारा सुटेल असेही हवामान खात्याने सांगीतले आहे. 

पुण्यात शनिवारी विश्रांती -
काही दिवसांपासून दुपारनंतर मुसळधार पडणाऱ्या पावसाने शनिवारी काहीशी विश्रांती घेतल्याचे पहायला मिळाले. शनिवारी दिवसभरात सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहर व परिसरात पुढील सहा दिवस (18 सप्टेंबर पर्यंत) मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असून घाट विभागात मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याची माहिती हवामान विभागे दिली आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT