Monsoon Latest Live Update
Monsoon Latest Live Update esakal
महाराष्ट्र

Monsoon Latest Update : दिवसभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

सकाळ डिजिटल टीम

पुण्याची पाणी कपात रद्द

पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला होता. आता ही पाणी कपात रद्द करण्यात आलेली आहे.

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता पुढील १५ दिवस बंद

पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीकरीता पुढील १५ दिवस पूर्ण बंद राहणार आहे. जिल्हादंडाधिकारी रायगड-अलिबाग यांनी निर्देश दिले आहेत. पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आलेला आहे.

कोल्हापूरमध्ये ५३ बंधारे पाण्याखाली

आज दि. 29 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 542.73 m इतकी आहे. तर विसर्ग 60870 क्युसेक. पंचगंगा नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00". एकुण पाण्याखालील बंधारे : 53. कोल्हापूर प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आलीय.

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला; नद्यांची पातळी स्थिरावली

जिल्ह्यात काल शुक्रवार पासून पावसाचा जोर ओसरला असून, नद्यांची पाणी पातळी स्थिरावली आहे. दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत केवळ ३ इंचांची वाढ झाली असून, ५३ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी ठप्पच आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘यलो’ अलर्ट दिल्याने पाऊस कमी होईल असा अंदाज आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर केर्ली (ता. करवीर) येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने काल या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू होती.

Monsoon Latest Live Update : चंद्रपुरात पूर, नदीकाठावरील ३४ गावांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर : विदर्भाच्या काही भागाला शुक्रवारीही धुवाधार पावसाने झोडपले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून एक जण कारसह वाहून गेला आहे. चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसामुळे तसेच वर्धा नदीच्या बॅक वॉटरमुळे पूर आला आहे. शहरातील अनेक वस्त्या पाण्याखाली आहेत. पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने चंद्रपूर- राजुरा, घुगुस-चंद्रपूर, वरोरा- वणी- यवतमाळ या मुख्य मार्गासह २० रस्ते बंद झाले आहेत. नदीकाठावरील ३४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुरगूडचा सरपिराजीराव तलाव ओव्हरफ्लो

मुरगूड शहराबरोबरच शिदेवाडी व यमगे गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारा व सर्वाची उत्कंठा वाढवलेला सरपिराजीराव तलाव शनिवारी (दि.२९) पहाटे पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू लागला. तलाव भरल्याने पाण्याची चिंता मिटली याबद्दल आनंद द्विगुणीत झाल्याचे मुरगूडकरांनी सांगितले.

खानापुरात तीन शाळा खोल्यांच्या भिंती कोसळल्या

खानापूर : तालुक्यातील इटगी ग्रामपंचायत (Itagi Gram Panchayat) कार्यक्षेत्रातील बेडरहट्टी गावातील सरकारी (Government school) उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या (Kannada School) तीन खोल्या शुक्रवारी (ता. २८) कोसळल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थी मैदानात प्रार्थनेसाठी उभे होते. त्यामुळे सुदैवानेच विद्यार्थी (Students) मोठ्या संकटातून बचावले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याला गेले तडे

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) परशुराम घाटात (Parashuram Ghat) नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणच्या भेगाही रुंदावल्या आहेत. याशिवाय घाटातील प्रत्येक टप्प्यावर दरडी कोसळल्या आहेत. एकेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आली असून, ती अद्याप हटवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. वाहतूकदारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रिटला २ जुलैला तडे गेले होते.

पुणे, कोल्हापुरात मुसळधार, मुंबई जलमय.. विदर्भात देखील पावसाचा इशारा

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, कोकणपट्टा, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आजही हवामान खात्याने प्रमुख शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालघरचा समावेश आहे. पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

आलमट्टी धरणात ८८.५०३ टीएमसी पाणीसाठा

शुक्रवारी सकाळी आठ वाजता आलमट्टी धरणातील पाणीसाठा ८८.५०३ टीएमसी इतका होता. म्हणजे धरण ७१.०९ टक्के इतके भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक दीड लाख क्युसेकपर्यंत झाल्यानंतर विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला.

चांदोलीत पावसाचा जोर कमी

शिराळा : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून धरण ८५.२५ टक्के भरले असून ११७०९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणात २९.३३टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सायंकाळी चार वाजता धरणाच्या पाण्याची पातळी ६२१.८० मीटर आहे. पाणीसाठा ८३०.४६४ दलघमी आहे.

राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद

राधानगरी : राधानगरी धरण क्षेत्र आणि पाणलाट क्षेत्रामध्ये पावसाची तीव्रता कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे काल रात्री बंद झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भोगावती नदीपत्रात होणारा विसर्ग थांबला आहे. आता केवळ वीजनिर्मितीसाठी १४०० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. परिणामी, पंचगंगा नदीचा पूर ओसरण्यास मदत होईल.

धोक्याची लक्षणे दिसताच लोकांचे स्‍थलांतर करा -  जिल्हाधिकारी डुडी

सातारा : जिल्ह्यात सुरू असलेल्‍या अतिवृष्‍टीमुळे दरडी कोसळणे, भूस्खलन यांचा धोका वाढलेला आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी संभाव्य धोक्यांचा इशारा देणारी लक्षणे लक्षात घेऊन तत्काळ त्‍या भागातील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज पत्रकार परिषदेत केले. याच वेळी त्‍यांनी जीवितहानी टाळण्‍यासाठीच्‍या सर्व उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्‍ज असून, नागरिकांनी आपल्‍या गावातील भौगोलिक बदलांवर लक्ष ठेवत त्‍याची माहिती प्रशासनास देण्‍याचे आवाहनही केले.

कोयना धरणात ६७.७९ टीएमसी साठा

पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ६७.७९ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद २९ हजार २५२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ४७ मिलिमीटर, नवजाला ९१ मिलिमीटर व महाबळेश्वरला ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पायथा वीजगृहातील दुसरे जनित्र चालवून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यास सुरुवात केली आहे. त्याअगोदर एका जनित्राद्वारे एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात आज 'यलो अलर्ट'

Monsoon Latest Live Update : राज्यात सध्या दमदार पावसानं हजेरी लावलीये. अनेक जिल्ह्यांत चांगला पाऊस चांगला झाला आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. तर, राज्यातील कोकणसह विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT