Rain Update News esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Rain : धरणे, तळे फुल्ल! मान्सूनचा निरोप; परतीचा प्रवास सुरू

दत्ता लवांडे

मुंबई : मागील काही दिवसांत जोरदार बरसलेल्या मान्सूनच्या पावसाचा आज शेवटचा दिवस आहे. आजपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, पावसाने लावलेल्या हजेरीमुळे राज्यातील सर्व प्रमुख धरणे भरली आहेत. तर अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

(Monsoon Rain Latest Updates)

दरम्यान, साधारणपणे आजपासून पुढच्या दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरताना दिसेल. तर आठ ते दहा दिवसांनंतर परतीचा पाऊस आपल्याला पहायला मिळणार असल्याची माहिती आहे. यावर्षीच्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गणेश विसर्जनानंतर राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक नागरिकांचे हाल झाले असून शेतकऱ्यांची पिके वाहून गेले होते. त्यामुळे अनेकांचे नुसकान झाले असून ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं होतं. या पावसामुळे राज्यातील कोयना, जायकवाडी, खडकवासला, उजनी असे प्रमुख धरणे ओव्हरफुल्ल झाले असून विसर्ग केल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

SCROLL FOR NEXT