Anil Parab  
महाराष्ट्र बातम्या

Anil Parab : वाढदिवस झाला, आता रिटर्न गिफ्ट द्या; परबांची पवार-फडणवीसांकडे अजब मागणी

रवींद्र देशमुख

मुंबई - मागील दोन दिवसांपासून अजित पवार यांच्याकडून आमदारांना देण्यात आलेल्या निधीची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. मात्र अजित पवार यांनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदारांना निधी दिल्याचे आरोप होत आहेत. निधीचाच मुद्दा धरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजब मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस झाला. दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त दोघांना सर्व स्तरातून शुभेच्छा मिळाल्या.

सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनातही निधीचा मुद्दा गाजत आहे. निधी आणि वाढदिवसाचे निमित्त साधून अनिल परबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली.

अनिल पराब म्हणाले की, देवेंद्र फडणवीस व अजित पवार याचा वाढदिवस होता. मात्र काही कारणास्तव दोघांनीही वाढदिवस साजरा केला नाही. मी संपूर्ण सभागृहाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दोघंही उपस्थित आहेत. आता आम्हा सर्वांना रिटर्न गिफ्ट म्हणून योग्य तो निधी द्यावा अशी अजब मागणी परब यांनी फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.

दरम्यान अजित पवारांकडून देण्यात आलेल्या निधीवर शिंदे गटातील आमदारांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले आहे. आमदार भरत गोगावले यांनी याची कबुली दिली. युतीत काहीही मतभेद नसल्याचं गोगावले यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT