Monsoon Session 
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session: धर्म मानणाऱ्या भाजपने सोमय्यांवर कारवाई करावी , अंबादास दानवेंची मागणी

Sandip Kapde

Monsoon Session:  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी  भाजपने सोमय्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. अंबादास दानवे यांनी काल विधान परिषदेत हा मुद्दा चांगलाचा गाजवला. त्यांनी याबाबत उपसभापतींकडे पुरावे दिले आहेत.

अंबादास दानवे म्हणाले, किरीट सोमय्या यांचा पेनड्राईव्ह दिलेला आहे. उपसभापती तपासणी करतील. मला अनेकांनी हे पेनड्राईव्ह मागितले पण मी देणार नाही. भाजपने आतापर्यंत दुसरा कोणी कार्यकर्ता किंवा नेता असता तर त्याला निलंबित केले असते. पण भाजपने किरीट सोमय्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस चौकशी करतील. मात्र धर्म मानणाऱ्या भाजपने सोमय्यांवर कारवाई केली पाहीजे.

राज्यात महिला अत्याचार वाढत आहेत. सरकार गुन्हेगारांना मोकाट सोडत आहे. राज्य गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पहिल्या क्रमांकावर येत आहे, असे देखील दानवे म्हणाले. 

राज्यातील राजकारणाचा स्तर घसरला आहे, यावर अंबादास दानवे म्हणाले, राजकारणाचा स्तर कोणी घसरवला, हे पाहण्याची गरज आहे. कुणाचीही वैयक्तिक लढाई होऊ नये, वैचारिक लढाई व्हावी. मात्र मागचे काही दिवस बघितले तर विचारांची लढाई आता वैयक्तिक होत आहे. सर्व राजकीय पक्ष याला जबाबदार आहेत, असे दानवे म्हणाले. 

पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज विरोधक सोमय्या प्रकरण, राज्यातील वाढते महिला अत्याचार यावर प्रश्न उपस्थित करणार आहेत. काल सोमय्या प्रकरणावर सभागृहात गोंधळ झाला. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT