monsoon update imd predicted heavy rain in state for next 5 days mumbai thane kokan  sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon : राज्यात पावसाचा जोर वाढणार! मुसळधार पावसाचा IMD चा अंदाज

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मॉन्सूनची एंट्री झाली आहे, मात्र अद्यापही राज्यातील बऱ्याचशा भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे, त्यामुळे अनेक ठिकाणा पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. यंदा पाऊस वेळेआधी येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र जूनचे पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरी राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. (monsoon update imd predicted heavy rain in state for next 5 days mumbai thane kokan)

दरम्यान राज्यात येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आगामी काळात मुसळधार पाऊस होईल असे देखील सांगण्यात आले आहे. १७ जून रोजी व्यक्त करण्यात आलेल्या या अंदाजात येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच

पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता असून त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. तर मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मॉन्सूनच्या पावसावर राज्यातील शेतकरी अवलंबून असतो, पाऊस झाला की शेतकरी पेरणी करतात मात्र आवश्यक तितक्या प्रमाणात अजूनही पाऊस न झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी अजूनही पेरणी करण्यासाठी पावसाची वाट पाहात आहेत. कृषी विभागानं शेतकर्‍यांना १०० से.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असं आवाहन केलं आहे. त्या सोबत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देखील पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असे आवाहन शेतकर्‍यांना केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT