rain
rain google
महाराष्ट्र

पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस; मोसमी वारे लवकरच धडकणार

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातही नैर्ऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे आहेत.

यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर आता गारव्याची चाहूल लवकर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंदमानात मोसमी पावसाचे (नैर्ऋत्य मोसमी वारे) आगमन झाले असून सहा दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात पोहोचला आहे. त्यामुळे तो केरळमध्ये आणि त्यानंतर काहीच दिवसांत महाराष्ट्रात पोचणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातही नैर्ऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. येत्या चारपाच दिवसांत, २१ मेपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच सुमारास मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

गुरुवारी (१९ मे) मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २० आणि २१ मे रोजी विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांत एकदोन भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्रात वादळी वाऱ्यासह (वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० किलोमीटर प्रतितास ते ६० कि.मी.) होण्याची शक्यता आहे.

काल सायंकाळी राज्यातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वगळता इतरत्र पावसाची नोंद करण्यात आली नाही. सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४५ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १८.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.

दरम्यान, आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील लोकांना काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT