महाराष्ट्र बातम्या

राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक ! आज 15 हजार 817 नवीन रुग्ण

भाग्यश्री भुवड

मुंबई, 12 : आज शुक्रवारी महाराष्ट्र राज्यात 15 हजार 817 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 22 लाख 82 हजार 191  झाली आहे. आज राज्यात 11 हजार 344 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 21 लाख 17 हजार 744 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.79 % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,10,485 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

दरम्यान राज्यात आज 56 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण 56 मृत्यूंपैकी 32 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 8 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 16 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या १६ पैकी पुणे - 7, ठाणे - 6, नागपूर - 2 आणि परभणी-1 असे आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.31 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 73 लाख 10 हजार 856 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 22 लाख 82 हजार 191 (13.18 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 42 हजार 693 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4 हजार 884 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

more than 15 thousand 800 new covid 19 patients detected in maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT