School ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांना ज्यादा तासाची अट! अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नवे नियम

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताना दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच १३ जून रोजी ऑफलाइन शाळा सुरु होणार आहेत. कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झाला आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांना ज्यादा तास घ्यावे लागतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताना दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच १३ जून रोजी ऑफलाइन शाळा सुरु होणार आहेत. कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झाला आहे.

त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या महिन्यात पुस्तकी शिक्षणाला सुरुवात न करता कोरोनासंबंधीचे नियम, स्वच्छता, सदृढ आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी शिक्षकांना ज्यादा तास घ्यावे लागतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या काळात भरमसाठ शैक्षणिक शुल्क घेतलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा पूर्णपणे बंद राहिल्या. पण, जिल्हा परिषदेच्या वतीने पारावरील शाळा, गृहभेटीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. तरीदेखील, ज्या मुलांकडे ॲन्ड्राईड मोबाइल नव्हते, ते विद्यार्थी शिक्षणात मागे राहिल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे ऑफलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांना ऑनलाइन शिक्षण समजले नाही. पालकांचा इंग्रजी शाळांकडील कल आता कमी झाला असून सेमी इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढला आहे.

दुसरीकडे मराठी शाळांमधील पटसंख्याही वाढली आहे. पण, ज्या विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेतील सर्व क्षमता विकसीत झाल्या नाहीत, त्यांच्यासाठी शिक्षकांना ज्यादा तास घ्यावे लागतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली. शहर-ग्रामीणमधील सर्वच शाळांसाठी तो निकष बंधनकारक राहील, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिकच्या तीन हजार ७४६ तर शहरात २२१ शाळा आहेत. त्याअंतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गात तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळाबाह्य मुले कमी व्हावेत, पालकांचा ओढा जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमध्ये वाढावा, यासाठी शिक्षकांना अतिरिक्त काम करावे लागेल, असेही महापालिकेचे प्रशासनाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी स्पष्ट केले.

कृतीतून शिक्षणावर अधिक भर
कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. घरी बसून राहिलेल्या विद्यार्थ्यांचे वजन वाढले तर काहींना डोळ्याचे, कानाचे विकार जडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. कृतीयुक्त शिक्षण त्यांना दिले जाणार आहे. जेणेकरून त्यांच्या शारीरिक अडचणी दूर होऊन मुले शिक्षणात रमतील, हा हेतू आहे.

१० जूनला सीईओ घेतील बैठक
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान ज्यादा तासातून भरून काढले जाणार आहे. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, यासाठी पहिल्या महिन्यात कशाप्रकारे अध्यापन करावे, यासबंधीचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी १० जूनच्या दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांची बैठक होणार आहे. त्यावेळी जिल्हा प्रशिक्षण व संशोधनचे (डायट) अधिकारी देखील उपस्थित राहतील.

पहिली ते आठवीच्या शाळांची स्थिती
शहरातील शाळा
२२१
एकूण विद्यार्थी
९९,५७५
ग्रामीण भागातील शाळा
३७४६
एकूण विद्यार्थी
२.०३ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT