hiv
hiv  Sakal
महाराष्ट्र

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक HIV बाधित महाराष्ट्रात; RTI मधून खुलासा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना (Corona) महामारीने मोठ्या प्रमाणात डोकं वर काढल्यानंतर संपूर्ण जगासह भारतातदेखील 2020-21 दरम्यान कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता. या कठीण काळात असुरक्षित लैंगिक कृतींमुळे (Unprotected Sexual Activity) देशभरात जवळपास 85,000 हून अधिक लोकांना एचआयव्हीची (HIV) लागण झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एचआयव्ही बाधितांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मध्य प्रदेशातील कार्यकर्ते चंद्र शेखर गौर यांनी दाखल केलेल्या आरटीआयला (RTI) उत्तर देताना नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने (NACO) ही माहिती दिली आहे. (How Many Indians Contracted HIV During Lockdown )

NACO नुसार एकट्या महाराष्ट्रात सर्वधिक 10,498 एचआयव्ही बाधितांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर, आंध्र प्रदेश 9,521 संसर्गांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये 8,947 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल अनुक्रमे 3,037 आणि 2,757 एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

NACO ने दिलेल्या माहितीनुसार, 2020-21 मध्ये देशभरात 85,268 HIV प्रकरणे असुरक्षित लैंगिक क्रियाकलापांमुळे नोंदवली गेली आहे. 2011-12 ते 2020-21 या कालावधीत असुरक्षित लैंगिक क्रियांमुळे नोंदवलेल्या HIV रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट दिसून आली होती. 2011-12 मधील 2.4 लाख एचआयव्ही रुग्णांची संख्या होती. तर, 2019-20 मध्ये ही संख्या 1.44 लाखांवर नोंदवण्यात आली होती. त्यानंतर 2020-21 मध्ये ही संख्या आता 85,268 वर घसरल्याचे NACO ने म्हटले आहे.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम (NACP), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक विभाग, 1992 मध्ये भारतात HIV/AIDS च्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी एक व्यापक कार्यक्रम म्हणून सुरू करण्यात आला होता. एचआयव्ही संसर्गाचा प्रसार कमी करण्याच्या उद्देशाने याची अंमलबजावणी करण्यात आली होती जेणेकरून देशातील मृत्यू आणि एड्सचा प्रभाव कमी करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT