CM-Uddhav-Nilesh-Rane 
महाराष्ट्र बातम्या

राजकारणातला अलिखित करार शिवसेनेने मोडला, निलेश राणेंचा प्रहार

उद्धव ठाकरेंनी सत्कार केला. त्या एकाचही नाव एफआयआरमध्ये नाहीय. सामान्य शिवसैनिकांचं नाव आहे.

दीनानाथ परब

मुंबई: "शिवसेना (shivsena) विरोध करण्यापलीकडे काय करु शकते. शिवसेनेला कितीही विरोध करु दे, शिवसेनेला कधीच भीक घातली नाही. २५-३० शिवसैनिक झेंडे घेऊन घराबाहेर येणं, याला विरोध म्हणत नाही. ही चिंपाट गिरी आहे, मुंबईच्या (Mumbai) भाषेत लुक्के गिरी झाली. आताचे जे सैनिक आहेत, त्यांना शिवसेना कळलेली नाही" अशा शब्दात नारायण राणेंचे (narayan rane) पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

"राजकारणात एक अलिखित करार असतो. तुम्ही माझ्या घरावर जायचं नाही. मी तुमच्या घरावर जाणार नाही. तो करार त्यांनी मोडला. त्याचे जे काही परिणाम आहेत, ते त्यांना भोगावे लागतील" असा इशारा निलेश राणेंनी दिला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आता सिंधुदुर्गात पोहोचली आहे. तिथे मनाई आणि जमावबंदीचा आदेश आहे, त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर निलेश राणे म्हणाले की, "शिवसेना राणेंना घाबरते. शिवसेना सोडली तेव्हापासूनच आमच्याबद्दलची भीती शिवसेनेच्या मनात आहे. यात्रेला जो प्रतिसाद मिळतोय, ते पाहून शिवसेनेला भीती वाटणं सहाजिक आहे"

"चार दिवसात ६० केसेस टाकल्या. मेट्रोला हे झेंडे दाखवतात, तेव्हा हजारोची गर्दी होते. पण एकावरही केस होत नाही. परवा आमच्या घरावर १००-१५० शिवसैनिक आले. वरुण सरदेसाई आणि अन्य काही जणांचा सत्कार उद्धव ठाकरेंनी त्यासाठी केला. त्या एकाचही नाव एफआयआरमध्ये नाहीय. सामान्य शिवसैनिकाचं नाव आहे. बड्या बापाची ही मुलं मागे राहून तमाशा बघणार. केसेस घ्यायची यांच्यात धमक नाही. केस घ्यायची पाळी येते, तेव्हा गरीब शिवसैनिक पुढे असतो" असं निलेश राणे म्हणाले.

"एवढ सर्व होऊनही शिवसेनेला कळत नाही. कोणाशी नडाव, कोणाशी नडू नये, भविष्यात त्यांना समजेल. यात्रा नियोजनानुसारच होणार, कितीही प्रयत्न केले तरी यात्रा जिथे संपायची तिथेच संपणार" असे निलेश राणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT