संभाजीराजे म्हणाले की, 'आरक्षणावर सगळं सविस्तर सांगतो. माझी भूमिका म्हणजेच शाहू महाराजांची भूमिका आहे.'
कोल्हापूर - मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. तरुणांमध्ये अस्वस्थता असून त्यांना नोकरीची चिंता आहे. आता यावर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी मंगळवारी एक ट्विट केलं होतं. त्याबाबत बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की,''राज्याचे अधिकार काढून घेतले का ? केंद्र सरकारने घेतलेली भूमिका यावर सगळं बोलणार आहे. पण सध्या कोरोनाची महामारी थांबविणे गरजेचे आहे. आत्ताही माझी भूमिका सामंजस्य आहे.'' (MP Sambhajiraje say soon declare stand about maratha reservation)
आरक्षणासाठी आता मोर्चे काढण्याची, उद्रेक काढण्याची वेळ नाही. सध्या कोरोनाचं संकट रोखण्याची गरज आहे, आपण जगलो तर आरक्षणाचा लढा लढू शकतो. मराठा समाजात नाराजी, अस्वस्थता आहे त्यावर मी लवकरच बोलणार आहे. आऱक्षणासाठी नेत्यांना भेटायची गरज नाही, मराठा आरक्षण अभ्यासक, गायकवाड न्यायाधीश यांची भेट घेणार असल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलं.
संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाबाबत लवकरच भूमिका जाहीर करू असं ट्विट केलं होतं. त्याबाबत संभाजीराजे म्हणाले की,''काल ट्विट यासाठी केलं की मराठा समाजात संभ्रम अवस्था आहे. कोर्टाचा निकाल आल्यावर राजकीय वातावरण गरम झालंय. थोड्याच दिवसांतच माझी आणि समाजाची भूमिका जाहीर करणार आहे. त्याआधी समाजाशी आणि तज्ज्ञांची चर्चा करून भूमिका मांडणार आहे.''
आरक्षणावर सगळं सविस्तर सांगतो. माझी भूमिका म्हणजेच शाहू महाराजांची भूमिका आहे. प्रत्येक राजकीय पक्षांकडून वेगवेगळी भूमिका घेण्यात आली आहे. त्यांची आणि माझी भूमिका वेगळी आहे. माझी भूमिका वैयक्तिक नसणार आहे. यावर लवकरच भाष्य करू असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.