maharashtra politics uddhav thackeray bring powerful issues maharashtra shiv sena politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: 'पोराला मंत्री करायचं होतं तर स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं', ठाकरेंना घरचा आहेर

दोघांनी खुर्च्या आटवल्यामुळं ही गद्दारी झाली

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होतं. त्यांनी कुणाकडे तरी पक्षाचे नेतृत्व द्यायला हवं होतं असं वक्तव्य ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. खासदार संजय जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्याच्या भुवया उंचावल्या आहेत.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी खुर्च्या आटवल्यामुळेच ही गद्दारी झाली असे म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंनाच घरचा आहेर दिला. ठाकरेंनी पोराला मंत्री करायला नको होतं. आणि पोराला मंत्री करायचं होतं तर स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं, असं मत जाधवांनी भरसभेत व्यक्त केलं. ठाकरेंमुळेच चोरांना संधी मिळाली, असा खोचक टोलाही त्यांनी नाव न घेता शिंदे गटाला लगावला आहे.

शिंदेंनी पक्षात गद्दारी का झाली? एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष का फोडला यावर भाष्य करताना थेट उद्दव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मंत्रीपदाच्या दोन खुर्च्या अडल्यागेल्यामुळे बाप गेला तरी पोरगा माझ्या डोक्यावर बसणारच असे एकनाथ शिंदे यांना वाटले यामुळेच त्यांनी बंड केले. दोघेही मंत्री झाल्यामुळे उद्धवसाहेबांचे दुर्लक्ष झाले, त्यांना लक्ष देता आले नाही, त्यामुळेच चाळीस चोरांना संधी मिळाली असेही जाधव म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे असलेले नगरविकास खातंही एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यानंतरही त्यांनी गद्दारी केली. आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात कोणत्याच मुख्यमंत्र्याने नगरविकास खातं दुसऱ्या कुणाला दिलं नव्हतं, ते तुम्हाला दिलं तरी तुम्ही गद्दारी केली, अशी टीका देखील जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

तर पुढे बोलताना जाधव म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता असताना अडीच वर्षे आमचा जो लाभ व्हायला हवा होता तो झाला नाही. तो काळ असाच गेला. एक सत्तेचा भाग जो आपल्याला मिळायला हवा होता तो मिळाला नाही याचे दु:ख होतं अंसही संजय जाधव म्हणाले आहेत.

ही वस्तुस्थिती आहे, मी केवळ त्यावर बोलत आहे. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी पक्ष संघटनेला वेळ द्यायला होता तो दिला नाही म्हणून आमच्यावर ही वेळ ओढावल्याचे जाधव म्हणाले. यामुळेच चोरांना संधी मिळाली असा टोलाही संजय जाधव यांनी शिंदे गटाला लगावला. जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते. आदित्य ठाकरेंना मंत्री करायचे होते तर स्वत: मुख्यमंत्री व्हायला नको होते, असेही संजय जाधव यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

SCROLL FOR NEXT