Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही; राऊतांचा सरकारला इशारा

महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut : महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांचा अपमान केला जात आहे. आम्ही काढत असलेला मोर्चा विरोधी पक्षांचा नाही, तर महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे. आमच्या मोर्चात सरकारनंही सहभाही व्हावं, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे. आम्ही लोकशाही मार्गानं मोर्चा काढत आहोत, त्यामुळं मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही. मोर्चा जाहीर झालाय आणि तो होणार आहे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात अशाप्रकारचे अनेक मोर्चे निघाले होते, असंही ते म्हणाले.

चित्रा वाघ यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे आहेत, असं म्हटलं. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 17 तारखेला होणाऱ्या या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन संजय राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाही मार्गानं केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे. त्यामुळं 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

आम्ही मोर्चा काढू नये असं वाटत होतं तर राज्यपालांना हटवायल पाहिजे होतं. आमच्या देवतांचा अपमान संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती करत आहेत, त्याचं समर्थन सरकार करतं, त्याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT