Amit Shah 
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah : 'अमित शाहांना अजूनही मातोश्रीचा धसका! भाषणातील २० पैकी ७ मिनिटे…'

रोहित कणसे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (१० जून) नांदेड येथे सभा घेतली. यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान अमित शाह यांची ही सभा हे भाजपाचे महासंपर्क अभियान होते की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन अशा सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला विचारला आहे.

संजय राऊतांनी ट्वीट करत अमित शाह यांच्यावर हल्ला चढवला आहे. संजय राऊतांनी म्हटलं की, "गृह मंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे.मला प्रश्न पडला आहे.हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन.."

अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. "अमित भाई यांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्रीचा धसका कायम.शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे. पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय..." असे संजय राऊत म्हणाले आहेत.

अमित शाह काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी ट्रिपल तलाख, कलम ३७०, राम मंदिर, समान नागरी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन काल नांदेड येथे झालेल्या सभेत अमित शाह यांनी केलं होतं. सत्तेसाठी दिलेला शब्द मोडून उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जावून बसले, त्यांनी गद्दारी केली, अशी टीका देखील शाह यांनी केली.

बहुमत मिळत असेल तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु सत्तेसाठी ते काँग्रेसच्या मांडीवर जावून बसले. समान नागरी कायदा आणला पाहिजे की नाही? ट्रिपल तलाख, कलम ३७० रद्द करण्याला तुमचं समर्थन आहे की नाही? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT