MP Sanjay Raut Slam K chandrasekhar rao maharashtra visit BJP CM Shinde Maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

KCR in Maharashtra : 'पांडुरंग खोक्यांकडेच नाही तर तेलंगणाच्या बोक्यांकडे देखील लक्ष ठेवून…'; ठाकरे गटाचा टोला

रोहित कणसे

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आटोपून परत गेले आहेत. राव यांचा बीएसआर पक्ष आगामी निवडणूकांपूर्वाी महाराष्ट्रात मुळं घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. ६०० गाड्यांचा ताफा घेऊन हैदराबादहून महाराष्ट्रात आलेल्या केसीआर यांनी महाराष्ट्र दौऱ्यात पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात पांडुरंगाचे दर्शन देखील घेतले. यावरून उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना टोला लगावण्यात आला आहे

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून केसीआर हे भारतीय जनता पक्षाची 'बी टीम' असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर यांच्या दौऱ्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी बीएसआर पक्षावर भाजपकडून सुपारी घेतली असल्याचा आरोप यावेळी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने किती तरी टीम बनवलेल्या आहेत, आता नवीन टीम बनवले आहे. २०१९ ला एमआयएमला बनवली होती, कधी एमएनएसला. रात गेली बात गेली. आता केसीआर यांना बोलावलं आहे. मात्र महाविकास आघाडी लढेल आणि जिंकेल असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

मी दैनिक सामना मध्ये माझ्या स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हित पाण्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी येण्याची गरज नाही. हा आमच्या राज्यातील हस्तक्षेप राहील. तुमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर ती काम करत नाही. या पक्षाकडे राष्ट्रीय धोरण नाही. तुमचा तेलंगणामधील पक्ष आहे, आंध्र प्रदेश मध्ये देखील नाही. पण तुम्ही महाराष्ट्रात घुसत आहेत. याच कारण भारतीय जनता पक्षाने तुम्हाला सुपारी दिली आहे, असे राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला त्रास द्यायचा यासाठी केसीआर यांचे प्रयोजन करण्यात आले आहे, असेह राऊतांनी सांगितले.

तेलंगणात ६५ सरपंचांची आत्महत्या

केसीआर यांच्या राज्यात आतापर्यंत ६५ सरपंचांनी आत्महत्या केल्या आहेत. का तर ग्रामपंचायतची बिलच मिळत नाही काम करून ,असे अनेक प्रकरण आहेत त्यांच्या राज्यात भ्रष्टाचार सर्वात मोठी प्रकरण आहेत. त्यांच्या मुलीवरती भ्रष्टाचाराचे प्रकरण आरोप आहेत. आणि त्यांची चौकशी सुरू आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ते भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मदत करायला घुसले आहेत.

पांडूरंग खोके-बोके दोघांकडे पाहत आहे..

विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि विठोबा सगळीकडे पाहत आहे. पांडुरंग आमचे दैवत आहे. पांडुरंग डोळे उघडे ठेवून प्रत्येक घडामोडीकडे पाहत आहे. तो खोक्यांकडे देखील पाहत आहे आणि तो तेलंगणाच्या बोक्यांकडे देखील पाहत आहे असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT