Raj Thackeray vs Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही; राज ठाकरेंच्या 'मनसे'ची राऊतांनी काढली लायकी

मनसेच्या वाट्याला गेल्यानं मुख्यमंत्रिपद गेलं, असा टोला राज यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला.

सकाळ डिजिटल टीम

ईडी काय आहे, हे मनसे प्रमुखांना सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगलाच अनुभव घेतलाय. ईडीचा अनुभव आमच्यासारख्या लोकांनी घेऊन सुध्दा आमच्या तोफा आणि पक्षाचं काम सुरुच आहे.

Sanjay Raut News : हिंदुत्ववादी पक्षाच्या कृतीत हिंदुत्व दिसत नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल सभेत केली. शिवाय, त्यांनी मनसेच्या वाट्याला गेल्यानं मुख्यमंत्रिपद गेलं, असा टोला राज यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कोणी कोणाच्या वाट्याला गेलं नाही. त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, असं सणसणीत प्रत्युत्तर राऊत यांनी राज यांना दिलंय.

महाराष्ट्रातील शिवसेनेचं (Shiv Sena) सरकार का गेलं, हे जगाला माहीत आहे. त्यांना (राज ठाकरे) जर माहीत नसेल, तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करुन पाडण्यात आलं आणि जोडीली खोके होते, असंही राऊत म्हणाले.

ईडी काय आहे, हे मनसे प्रमुखांना सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगलाच अनुभव घेतलाय. ईडीचा अनुभव आमच्यासारख्या लोकांनी घेऊन सुध्दा आमच्या तोफा आणि पक्षाचं काम सुरुच आहे. शिवसेनेनं कधीच हिंदुत्व सोडलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT