Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

उदयनराजे उद्या मोठी घोषणा करणार! ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

उद्या एक मोठी घोषणा करायचे मनात आहे.

सकाळ डिजिटल टीम

सातारा: खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा वाढदिवस आहे. सातारकर (Satara) नेहमीच राजेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजवाड्यावर दरवर्षी गर्दी असते. उद्या (ता. २४) ते एक मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी त्यांनी पत्रकारांना व जनतेस निमंत्रण दिले आहे. या संदर्भात उदयनराजे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यानंतर राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या महाराष्ट्रात चाललेले सत्ताधारी आणि विरोधक यांच्या टीका-टीप्पणी नंतर आता उदयनराजे काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान,उदयनराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, उद्या एक मोठी घोषणा करायचे मनात आहे. राजकीय आरोप-प्रत्याआरोपांच्या ह्या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील त्यामधले काहीच आसणार नाही. उपक्रम अभिनव असे आहे. तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे नाही.

आपण सारेच आपल्या भोवती सुरू असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र...

आपण सारेच आपल्या भोवती सुरू असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वतःच एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे.

कोणता प्रश्न काय व्यवस्था अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणांस सदर पत्राने आमंत्रण देत आहोत.२४ फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता गांधी मैदान, राजधानी सातारा याठिकाणी आपण उपस्थित रहावे असे आमंत्रण देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT