MPSC Exam sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी २९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. २७४ पदांसाठी २८ एप्रिल २०२४ रोजी परीक्षा घेण्याचे नियोजित होते. परंतु राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र १० टक्के आरक्षण देऊ केले. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती.

राज्य सरकारने मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करुन स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलं आहे. त्यामुळे राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरीता हे आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ८ मे रोजी काढलेल्या शुद्धीपत्रकात म्हटले आहे की, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण निश्चिती करुन सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनात कळविण्यात आलेले असून आयोगाच्या २१ मार्च २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तूत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आता शनिवार, दि. ६ जुलै २०२४ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे.

राज्यसेवा परीक्षेमार्फत भरावयाची एकूण पदे ४३१ आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी गट - अ ७ पदे, सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ ११६ पदे, गटविकास अधिकारी, गट-अ ५२ पदे, सहायक संचालक- ४३ पदे, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी- ३ पदे अशा ५२४ पदांचा सुधारित तपशील शुद्धीपत्रकात देण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

पत्नीला पळवलं; नंतर आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या पतीला पाठवले, स्वयंघोषित गुंडाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime: पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; एकाला अटक, चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांची तपासणी अन् काय घडलं!

Dope Test Before Marriage: नशा कराल तर तुमचं लग्न होणार नाही, डोप टेस्ट म्हणजे काय? लग्नाच्या आधी अनिवार्य करण्याची संसदेत मागणी

नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग सिरीजची रिलीज डेट जाहीर ! विजय वर्मा साकारणार मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT