CM Kisan Yojana 
महाराष्ट्र बातम्या

आता राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना'; शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला १२ हजार रुपये

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकराच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू कऱण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो.

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आधीच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला एकूण केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे १२ हजार रुपये मिळू शकणार आहे.

दरम्यान योजनेसाठी पुढील आर्थिक वर्षात तरतूद करण्यात येणार आहे. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच ही रक्कम टप्प्या-टप्प्यात देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळण्यासाठी काय अटी असणार हे स्पष्ट नाही. शिवाय केंद्र सरकारने लावलेल्या अटी मुख्यमंत्री किसना योजनेला लागू होणार का, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र तीन दिवसांपूर्वी झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. यामध्ये अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री किसान सन्मान योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनेसाठी विभागीय पातळीवर कामही सुरु झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT