Mumbai 24 Hours' Policy Rules declare 
महाराष्ट्र बातम्या

'मुंबई 24 तास' धोरणाची नियमावली जाहीर; काय आहे नियमावली?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : "मुंबई 24 तास' धोरणाची नियमावली राज्य सरकारने आज जाहीर केली. त्यानुसार रात्री दीड वाजल्यानंतर मद्याची विक्री केल्यास विक्रेत्याचा मद्य परवाना दोन वर्षांसाठी रद्द होणार आहे तर, मॉल्सना त्यांची दालने 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी गमवावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच बरोबर मॉलमधील मल्टिप्लेक्‍स रात्री एकनंतर सुरु ठेवण्याबाबत कामगार विभागाकडून नियमावली तयार करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अबकारी विभागाच्या नियमानुसार बार रात्री 1.30 पर्यंत बंद होणे आवश्‍यक आहे. त्यानुसार 1.30 वाजल्यानंतर केवळ मद्य विक्री करता येणार नाही. त्यासाठी ग्राहकांकडून शेवटची ऑर्डर रात्री एक वाजेपर्यंत घेता येणार आहे. तशी नोटीस दर्शनी ठिकाणी लावणेही बंधनकारक आहे.

केजरीवाल अमित शहांना म्हणतात,' सर, मोफत चार्जिंगची सोयही केली आहे!

मॉल्स आणि मिलवरील जमिनीवर असलेल्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 24 तास व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भविष्यात या योजनेचा विस्तार रेल्वे स्थानके, विमानतळ, बिझनेस हबच्या परिसरातील उपहागृह सुरु ठेवण्याचा विचार करण्यात येईल. क्रिकेटच्या सामन्यांच्या वेळी पोलिस सुरक्षा पुरवल्याच्या मोबदल्यात संबंधितांकडून शुल्क वसुल केले जाते. त्याच धर्तीवर एखाद्या ठिकाणी मोठी गर्दी होणार असेल तर त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरवल्यास संबंधितांना शुल्क भरावे लागणार आहे. त्याच बरोबर गरजेनुसार बेस्ट बसेसही सुरु ठेवण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ, नव्या मालकांनी मोजले १६ हजार ७०० कोटी रुपये

उद्धव ठाकरेंची निरोपाच्या भाषणात टोलेबाजी! PM मोदींपासून DyCM शिंदेंपर्यंत, सिलिंडर ते रेडा; कवितेतून मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या

वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Pimpari News : गॅस टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ

क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT