mumbai goa highway congress leader vijay wadettiwar 
महाराष्ट्र बातम्या

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका; वडेट्टीवारांची व्हिडिओ शेअर करत टीका

कार्तिक पुजारी

मुंबई- गणेशउत्सवानिमित्त मोठ्या संस्खेने चाकरमाने कोकणात जात असतात. दोन दिवसांवर गणपती आल्याने चाकरमानी कोकणाकडे धाव घेत आहेत. पण, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आज सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका बसला.गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा हायवे वाहतूकीसाठी सुरळीत केला जाईल अशी ग्वाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. यासाठी चार वेळा महामार्गाचा पाहणी दौरा करून सुद्धा गणेशोत्सवासाठी महामार्ग नीट बनत नसेल तर त्या दौऱ्यांचा आणि आश्वासनांचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला आहे.

चाकरमानी कोकणात जाणार असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी आणण्यात आली होती. पण, तरीही अवजड वाहणांची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास येत आहे. रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून १० मिनिटांच्या अंतरासाठी ४० ते ५० मिनिटं लागत आहेत.'गणेशोत्सवासाठी उत्साहाने घराकडे जाणाऱ्या चाकरमान्याचा आज हिरमोड झाला आहे', अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ३ ते ४ किलोमीटरच्या या रांगा लागल्या आहेत. चाकरमानी एसटी महामंडळाच्या बसेसचाही वापर करत आहेत. पण, बसेची संख्या कमी पडत असल्याची तक्रार आहे. प्रवाशांना बस मिळण्यासाठी चार-पाच तास अगोदरच बसस्थानकात येऊन थांबावं लागत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT